shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते गोटूंबे आखाडा येथे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२३

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते गोटूंबे आखाडा येथे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न..!!

राहुरी :  तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथील शिंदे कॉलनीतील मारुती शिंदे घर ते डहाळे रस्त्यापर्यंतचे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दि. २६ फेब्रवारी रोजी सायंकाळी ८:३० वाजता आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानीक विकास निधीतून १० लक्ष रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

 गोटूंबे आखाडा गावातील सद्या सर्वे नंबर ४१ व ४२ मधील ग्रामस्थांना आलेल्या नोटिसाबाबत व गायरानचे गावठाण करण्याबाबत मागणी केली असता शासन दरबारी याबाबत नक्कीच पाठपुरावा करून व विद्यापीठ प्रशासनाची माहिती घेऊन गायरान जामीन बाबत नक्कीच ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिले जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे काम चालू आह़े व सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करून थोड्याच दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने सुनिल शिंदे यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आभार व्यक्त केले व ग्रामस्थांनी या गावात अजून विकास कामांची मागणी केली असता मला निवेदने द्यावीत त्यानूसार एप्रिल नंतर शक्य होईल तितकी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामस्थांना दिले. 
      याकार्यक्रम प्रसंगी  कृषी उत्पन्न बाजार समिती चे  मा.चेअरमन मच्छिंद्र पवार, सुनिल शिंदे,आण्णासाहेब बाचकर,अय्युबभाई पठाण,पं स उपसभापती प्रदीप पवार, पप्पूशेठ मालपाणी, सचिन भिंगारदे, ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, अश्विनीताई कुमावत, असफ पठाण, पोपट चोपडे, मुंकुद शेडगे, उमेश बाचकर, मधुकर साळवे, मुकींदा शिंदे,सरपंच मालतीताई साखरे, उपसरपंच तुकाराम बाचकर, सदस्य शिवाजी पवार, सुनिल कुमावत दुर्गाश वाघ, मन्सुर शेख,भरत पवार, भवार मामा, अय्युब शेख दीपक शिंदे, शंकर शिंदे , दुर्गा शिंदे, रामा शिंदे, मुकिंदा शिंदे, अण्णा शिंदे ,अशोक शिंदे, बाबासाहेब हुसेन शिंदे, साहेबराव शिंदे, हुसेन मारुती शिंदे, बापू मारुती शिंदे, लक्ष्मण हुसेन शिंदे, ताया गोविंद शिंदे ,मारुती मुकिंदा शिंदे ,ताया मल्हारी शिंदे, रवी शिंदे, अनिल शिंदे, दीपक शिंदे, संतोष शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे गणेश शिंदे ,रमेश शिंदे , बाबासाहेब शिंदे ,वसंत शिंदेसह आदी. ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close