सहजयोगाने आरोग्य निरोगी रहाते - जितेंद्र रसाळकर
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १ / अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे, न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित सहजयोग शिबिर मंगळवार दि. २८/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले . या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. व्ही. ई. शिंदे यांनी केले .
श्री. अशोक कोतकर श्री. जितेंन्द्र रसाळकर,श्री. बाळासाहेब शेवाळे ,श्री. श्रीमंत किनकर ,श्री.अनंत रोहकले, श्री .महाजन सर या सर्व अतिथींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
श्री. जितेंन्द्र रसाळकर यांनी दैनंदिन जीवनातील सहजयोगाचे महत्व व फायदे , सहजयोगाचे निरोगी आयुष्यासाठी असणारे महत्व सांगितले व सर्व उपस्थितांकडून सहजयोग करवुन घेत तो कशा पद्धतीने करायचा हे प्रात्यक्षितासह समजावून सांगितले व उपदेशपर मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
श्री. अशोक कोतकर यांनी ही सहजयोगाबद्दल माहिती दिली .याप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गिरीष हिरडे व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .अतुल मोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षेकर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुंभागी बाबर यांनी तर आभार प्रदर्शन पुजा पेरके यांनी केले .

