राजवर्धन पाटील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व असल्यामुळे ते युवकांचे अशास्थान झाले - इंदापूर तालुका सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे.
राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवस वालचंदनगर येथील नलवडेवस्तीच्या जि. प. प्रा. शाळेच्या मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप देऊन सामाजिक उपक्रमातून साजरा .
इंदापूर: राजवर्धन पाटील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व असल्यामुळे ते युवकांचे अशास्थान झाले असे गौरवपूर्ण उद्गार भाजप युवा मोर्चा कोर कमिटीचे प्रमुख व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वालचंदनगर येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रमातून वालचंदनगर येथील नलवडे वस्ती जिल्हा प्राथमिक शाळा येथे साजरा करण्यात आला यावेळी इंदापूर तालुका सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे यांनी काढले.
वालचंदनगर येथील नलवडे वस्ती जिल्हा प्राथमिक शाळा येथे राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना वह्या व खाऊ वाटप वालचंदनगर च्या माजी सरपंच सौ. छाया मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी इंदापूर तालुका सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे,युवा नेते सागर भोसले, प्रवीण शेटे सर,सौ विजया पिंपरे ,सौ मांगले मॅडम उपस्थित होते.
यावेळी इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे यांनी सांगितले की, नीरा भीमा चे संचालक राजवर्धन दादा यांनी तालुक्या मध्ये तरूण युवकांचे संघटन निर्माण केले आहे. जनसामान्या पर्यंत पोहचनारे , मनमिळावू स्वभावामुळे ते अल्पावधीतच तालुक्यामध्ये लोकप्रिय झाले.सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व असल्यामुळे ते युवकांचे अशा स्थान झालेले आहेत.
तसेच सागर भोसले यांनी माहिती देताना म्हटले की, लवकरच राजवर्धन दादा चषक वर्ष दुसरे हे भव्य क्रिकेट चे सामने वालचंदनगर येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी सदरच्या कार्यक्रमावेळी प्रवीण शेटे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

