shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भिमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूरच्या वतीने ९८ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी.

 निरा भिमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात 
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूरच्या वतीने ९८ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी.

माजी साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी उपक्रमास   दिल्या शुभेच्छा.

इंदापूर प्रतिनिधी: आज दि. ३१जानेवारी रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर. यांच्या संयुक्त विद्यमाने निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर ,या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बेलवाडी, कर्दनवाडी, लासुणें, अंथुणे, थोरातवाडी, या गावांच्या परिसरातील 98 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आले. यावेळी माजी साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. चिखली फाटा, चव्हाणवाडी , लासुरणे ,अंथुणे या परिसरातील ऊसतोड मजुरांची तपासणी करताना कारखान्याचे सभासद किशोर लोखंडे,रोहन गांधी, उत्तम धापटे, लतीफ भाई शेख, अभिजीत गायकवाड, ओंकार पवार, टोळी मालक देवकर सुनील, देवकर प्रकाश, कोमल सिंग ठाकरे, निरा भिमाचे कर्मचारी श्री विजय सपकाळ, प्रतीक चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय रणजीत साठे केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर यांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली.
close