स्वराज्य ची उत्तर महाराष्ट्रात
 देखील यशस्वी घोडदौड सुरू

कमलेश शेवाळे 
राहुरी : येथील ग्रामदैवत खंडोबा महाराज मंदिराच्या आवारात नुकतीच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटने ची छोटेखानी बैठक योगेश शेठ सुराणा आणि विश्वस्त भरत नजन यांच्या नियोजनाखाली संपन्न झाली.


या संघटनेचे महाराष्ट्र राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यात यशस्वी कार्य सुरू आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आता संघटनेची यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे आणि मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा) हे दोघे कायमच सर्वांना मार्गदर्शन करत असतात.आणि याचेच औचित्य साधून राहुरी येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जुने जाणते नाव असलेले तथा संघटने चे पदाधिकारी योगेश शेठ सुराणा यांच्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटक समीरभाई शेख ,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन चांदघोडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष आहेर - पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हरिश्चंद्रे, जिल्हा सचिव शंकरराव कवाणे, नुतन जिल्हा प्रवक्ता गणेश हिंगे यांचा सत्कार योगेश सुराणा शेठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा) म्हणाले की संघटने मध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज न करता संघटन मजबूत करा जेणेकरून गट- तट निर्माण होणार नाहीत. 

यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष संतोष आहेर - पाटील म्हणाले की, वर्षाअखेरापर्यंत  जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात मजबूत संघटन करणार केले जाईल,यावेळी विश्वस्त भरत नजन, महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष जावळे तसेच चिंचविहिरे शाखा अध्यक्ष अनिल गिते, शाखा सचिव सागर मुरकुटे, कणगर शाखा अध्यक्ष अशोक आरंगळे, गणेगाव शाखा अध्यक्ष विजय कोबरणे, सदस्य तेजस आरंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश सुराणा शेठ यांनी अथक परिश्रम घेतले.