वडार समाजातील ख्यातनाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पहिले मल्ल पै.मारुती आण्णा वडार-(चव्हाण) होते. ता.कराड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या वडार यांनी लिस्टर (इंग्लंड),पॅरिस,बर्मिंगहॅम यासह दहा देशांत आपल्या कुस्तीचे प्रावीण्य दाखवले होते.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल पै.मारुती आण्णा वडार कोपर्डे हवेली (ता.कराड) येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या वडार यांनी लिस्टर (इंग्लंड),पॅरिस,बर्मिंगहॅम यासह दहा देशांत आपल्या कुस्तीचे प्रावीण्य दाखवत देशाचा नावलौकिक वाढविला.
हालाखीच्या आर्थिक परिस्थितीत केवळ जिद्दीच्या जोरावर लक्ष्मण आप्पांनी कुस्ती क्षेत्रात जागतिक स्तरावर केलेला प्रवास थक्क करणारा आहे.त्यांच्या या अलौकिक कार्याची दखल घेत २००७ मध्ये क्रीडा प्रबोधिनीने मानाचा क्रीडा भूषण पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला होता. मात्र हा एकमेव पुरस्कार वगळता क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवत देशाचे नाव उंचावणारे आप्पा राजकारणामुळे दुर्लक्षित राहिल्याची खंत आजही व्यक्त केली जात आहे. आप्पा या नावाने परिचीत असणाऱ्या वडार यांनी त्यांच्या कोपर्डे हवेली गावाशेजारी पार्ले गावातून पैलवानकीस प्रारंभ केला.
त्यानंतर कराडच्या आझाद हिंद आखाड्यात पै. बाबुराव वास्के आणि पै.तुकाराम पत्की या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले.
हा त्यांचा एकंदर इतिहास पहाता शासनाने वडार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळास त्यांचे नाव देणे स्वागताहार्यच आहे.
सदर वडार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यासाठी औसा मतदार संघाचे आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार व सामाजिक कार्यकर्ते माननीय नितीनजी वाघमारे यांनी पाच वर्षापासून योग्य पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लावले. यामुळे वडार समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री यांच्या "सागर" या निवासस्थानी मा.देवेद्रजी फडणवीस व आमदार अभिमन्युजी पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

