प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज, अंबेजोगाई तालुक्यातील देवस्थानाच्या विकासकामासाठी केज विधानसभा मतदारसंघात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून दहा गावात प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची निधी उपलब्ध झाला असून तेथील तिर्थक्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.
केज मतदारसंघात अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. देवस्थानाचा वाढती प्रसिद्धी लक्षात घेऊन या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक झाले होते. नमिता मुंदडा यांनी मतदारसंघातील दहा देवस्थानाच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. अखेर त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासह दहा देवस्थानांची विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या देवस्थानांमध्ये केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली देवस्थान, राम मंदिर (युसूफ वडगाव), वाघेश्वरी मंदिर (वाघे बाभूळगाव), नागेशपुरी मठ संस्थान (वरपगाव), धनेगाव मेसाई मंदिर (धनेगाव), राम मंदिर ( आवसगाव), आणि संत नामदेव महाराज मंदिर (चिंचोली माळी) आणि अंबेजोगाई तालुक्यातील खोपरनाथ मंदिर (चन ई) , एकमुखी दत्त मंदिर देवस्थान (माकेगाव), देवी मंदिर (देवळा) या दहा देवस्थानांचा समावेश आहे.
या सर्व देवस्थानाच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आमदार नमिता मुंदडा यांचे केज, अंबेजोगाई तालुक्यातील भाविक भक्तांकडून अभिनंदन केले जात आहे.


