shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार कडून आरतीला निवाऱ्याचा ताबा ; तसेच आरतीला तातडीने मदत करा-जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदारांना आदेश..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार दिनांक ११ मार्च २०२३

प्रहार कडून आरतीला निवाऱ्याचा ताबा ;  तसेच आरतीला तातडीने मदत करा-जिल्हाधिकाऱ्यांचे  तहसिलदारांना आदेश..!!

अहमदनगर  : देवळाली प्रवरा येथील अनाथ असलेल्या आरती निलेश पंडित हिला जागतिक महिला दिनाचे निमीत्ताने आज प्रहार कडून निवाऱ्याचा ताबा देणेत आला. आणि सायंकाळी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राहुरीच्या तहसीलदारांना आरतीला मदत देण्याचे आदेश दिले. 
    आरतीला तिचा निवारा ताब्यात देताना प्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, प्रहार  जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, राहुरी येथील प्रतिथयश उद्योजक स्वप्निल उदावंत, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, मेजर महादेव आव्हाड, विदिज्ञ पांडुरंग औताडे, अनिल औताडे, विकास कोतकर, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार श्रीमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष किरण पंडित, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी,  महिला शहराध्यक्ष भाग्यश्री कदम, उपाध्यक्ष आशा माळी, संघटक सुनील कदम, इमरान शेख, सनी सोनवणे,  प्रहार श्रमिक संघाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी फॅक्टरी उपाध्यक्ष गणेश भालके, प्रहार गळलिंब शाखाध्यक्ष कृष्णा  शेळके आदि उपस्थित होते.

     तिला हा तात्पुरता निवारा दिला असल्याने तिची वडिलोपार्जित जमीन तिला मिळवून देण्यासाठी आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि निवेदन देवून आरतीची व्यथा मांडली असता तातडीने रेशन कार्ड तसेच तिची शेत जमीन शोधून तीच्या नावे करावी आणि रमाई आवास योजने मधून तिला पक्के घर द्यावे  यासह तिला संजय गांधी निराधार योजना तातडीने लागू करण्याची अहमदनगरचे जिल्हाधिकारी  साहेब यांनी राहुरीचे तहसीलदार फसियोदिन शेख यांना आदेश दिले आहेत. 

        आरती निलेश पंडित हिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवारा दिल्यानंतर आज प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार श्रमिक संघाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी फॅक्टरी उपाध्यक्ष गणेश भालके, प्रहार गळलिंब शाखाध्यक्ष कृष्णा  शेळके आदींनी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ साहेब यांची भेट घेतली व  आरतीच्या समस्यांचा पाढा वाचला.
 प्रसंगी काही कामानिमित्त राहुरीचे तहसीलदार फसियोदीन शेख साहेब हे जिल्हाधिकारी कार्यालयातच उपस्थित असल्याने जिल्हाधिकारी साहेबांनी आरतीला तातडीने वरील मदत देउन सहकार्य करावे असे तहसीलदारांना आदेश दिले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close