माळवाडी नं. २ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे ग्राम दिंडी प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: माळवाडी नंबर २ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे ग्राम दिंडी प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या दिंडीची सुरुवात माळवाडी गावचे सरपंच सौ मंगलाताई बाळासाहेब व्यवहारे यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिर पासून ग्राम दिंडी प्रशिक्षणाची सुरुवात पालखी खांद्यावर घेऊन टाळ व स्वामी समर्थांच्या भजनाच्या निनादांमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. मिरवणुकी प्रसंगी नाचत वाजत गाजत पालखी सोहळा काढण्यात आला .ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पालखी दर्शन करून या सोहळ्यामध्ये ग्रामस्थ सहभागी होत असताना दिसून आले. अतिशय भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दाखल झाल्यानंतर या ठिकाणी स्वामी भक्तांनी आपले अनुभव व्यक्त केले तसेच स्वामी भक्तांच्या वतीने सर्व दुःखाचे निवारण स्वामी समर्थ करीत असतात त्यासाठी स्वामी समर्थांचे नामजप करावे असेही यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
याप्रसंगी  माळवाडी चे सरपंच मंगल(ताई)बाळासाहेब व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर व्यवहारे,माळवाडी चे माजी सरपंच वनिता गार्डे, माजी सरपंच लतिका व्यवहारे, वैष्णवी गारडे, सुवर्णा व्यवहारे , स्वाती व्यवहारे राजू गार्डे, सचिन व्यवहारे, अमोल गार्डे, अतुल शिंदे,ईश्वर काळे, दादा गार्डे, अशोक व्यवहारे, अरुण व्यवहारे, संतोष व्यवहारे व इतर स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.