निरा डावा कालव्यावरील लाभ धारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कमी करावी म्हणून केले कळंब सांधा चाळ चौक येथे रासपने रस्ता रोको आंदोलन.
इंदापूर प्रतिनिधी :- निरा डावा कालव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कमी करावी यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कळंब (सांधा चाळ)। चौक येथे दि.१३ रोजी स.१०.०० वाजता रस्ता रोको आंदोलन पार पडले . यावेळी उपस्थित पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना निवेदन पत्र देण्यात आले.जलसंपदा पाटबंधारे विभाग द्वारा निरा डावा कालव्यावरील लाभधारक शेतकर्याना पाणीपट्टी भरण्याचे महाराष्ट्र शासनाने सक्तीचे केले आहे जर पाणी पट्टी न भरल्यास उभ्या पिकांमध्ये पाणी दिले जाणार नाही असे आवाहन लाऊंड स्पिकर द्वारे करत असून हि बाब अत्यंत निंदनीय असून त्यांचा निषेध म्हणून व शेतकरी पाणी पट्टी बारामती तालुक्याच्या पध्दतीने प्रती एकर १०० रूपये घेण्यात यावी या साठी राष्ट्रीय समाज पक्षांचे रस्ता रोको आंदोलन कळंब सांधा चाळ चौक येथे जलसंपदा पाटबंधारे विभाग यांच्या विरोधात केले असल्याचे माहिती राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी तालुकाध्यक्ष आकाश पवार यांनी पत्रकारांना दिले.बारामती तालुक्याला जेवढे पाणी मिळते त्याच्या निम्मे सुद्धा पाणी इंदापूरला मिळत नाही. आंदोलन प्रसंगी पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी मार्गदर्शन केले . ते बोलताना म्हणाले की संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष यांनी दिलेले निवेदनावर पुढे जाऊन पाठपुरावा करावा , चालू विधिमंडळामध्ये आमदार व मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळेस तालुक्याचे तालुकाध्यक्ष तानाजी मारकड , तंटामुक्ती अध्यक्ष रामदास अर्जुन ,युवक आघाडीचे प्रवक्ते ॲड. दिलीप धायगुडे , निमसाखर ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे , सुराज्य निर्माण सेनेचे कार्याध्यक्ष रविराज भाळे पाटील , जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राज- माने पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, इंदापूर तालुका अध्यक्ष तानाजी मारकड , तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक नेते नवनाथ कोळेकर ,सोशल मीडियाचे समन्वयक ज्योतीराम गावडे, बजरंग वाघमोडे राजेंद्र देवकाते ,सागर देवकाते, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश हेगडकर, तात्याराव मारकड , इंदापुर शहर अध्यक्ष श्रीनिवास सातपुते , प्रशांत पाटील, श्रीनिवास पाटील, कळम गावाचे युवा नेते विनोद दादा रुपनवर , दुर्गामाता तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य कळम गावातील व आसपास परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

