धनगर ऐक्य परिषदेचा पाठींबा भाजपाला नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना - डाॅ.शशिकांत तरंगे.
देणार्या मानसाचे आभार मानणे,कौतुक करणे ही धनगर समाजाची परंपरा - डाॅ.शशिकांत तरंगे.
इंदापूर:धनगर ऐक्य परिषदेच्या आवाहनाला मान देवुन धनगर समाजाने इंदापूर तालुक्यातुन धनगर समाजाच्या विकासासाठी गेल्या नोव्हेंबर पासुन राजभरात खुप मोठे आंदोलन उभारले.त्यामध्ये ७५ वर्षापासुन धनगर समाजाच्या प्रश्नावरती अनेक नेत्यांनी राज्यात आंदोलने करून मोठा लढा उभारला.परंतु ७५ वर्षात कोणत्याही सरकारने धनगर समाजाकडे संवेदनशिल भावणेने पाहीले नाही.पाच डिसेंबर २०२२ च्या आंदोलनाची भाजप सरकारने दखल घेवुन उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेबरोबर धनगर ऐक्य परिषदेच्या झालेल्या बैठकीत धनगर ऐक्य समीतीच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्या.म्हणुन धनगर ऐक्य परिषदेचा पाठींबा भाजपाला नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे मत धनगर ऐक्य परिषदेचे नेते डाॅ.शशिकांत तरंगे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले. इंदापूर पंचायत समीती अल्पबचत सभागृह येथे धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी डाॅ.शशिकांत तरंगे हे बोलत होते.
यावेळी धनगर ऐक्य परिषदचे गोविंद रुपनवर, संजय रुपनवर,
बापूराव सोलनकर, मोरेश्वर कोकरे, आप्पा माने, गजानन वाकसे, दिलीप पाटील, शहाजी पाटील, विशाल मारकड, सागर रेडके, बापू पाटील, वसंत मारकड, दादा भाळे, अनिल काळे, लक्ष्मण देवकाते, दिलीप वाघमोडे, सतीश तरंगे, सचिन सूळ, युवराज रेडके, प्रदीप बंडगर, आबा मारकड व मान्यवर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव उपस्थित होते.
गेल्या ७५ वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या धनगर समाजाला न्याय देण्याचे काम उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले म्हणुन देणार्या मानसाचे आभार मानणे,कौतुक करणे ही धनगर समाजाची परंपरा आहे.आम्ही कोण कोणत्या पक्षात आहोत, यापेक्षा ज्यांनी दीले त्यांचे कौतुक करण्यासाठी आम्ही या ठीकाणी आज एकत्रीत आलो असल्याचे तरंगे म्हणाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रात धनगर समाजाचा लढा हा सातत्याने उभा राहीला.गेल्या नोव्हेंबरमध्ये इंदापूर तालुक्यातुन हा लढा सुरू झाला.घोगडी बैठकांच्या माध्यमातुन तालुक्यातुन मोठे आंदोलन उभे राहीले.आनेकजन या आंदोलनात सहभागी झाले.तर राजकीय मंडळी आंदोलनापासुन बाजुला झाले. आनेकांनी जातीयवाद पसरवीत असल्याचे आरोपही केले.आनेकांनी आमच्या सहकार्यांना तुम्ही का नादी लागला,७५ वर्षात धनगर समाजाला यश येत नाही,आपले वर कोणीही नाही,आपली वर सत्ता नाही,आपला वर नेता नाही,विनाकारण वेळ वाया घालवू नका, खर्च करू नका,तुम्ही तुमचे कष्ट करा,आपला प्रपंच उभा करा,अशा प्रकारे समाजबांधवांना भ्रमित करण्याचा प्रयत्न आनेक वेळा झाला, परंतु गेल्या १५ वर्षापासुन या धनगर समाजाचे प्रत्येक लढ्याचे नेतृत्व आणि या धनगर समाजाला काहीतरी मिळाले पाहीजे यासाठी सातत्याने महाराष्ट्रभर आंदोलने केली आणी शेवटी लढ्याला यश आल्याचे शशिकांत तरंगे म्हणाले,

