shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव 

 शौकतभाई शेख
श्रीरामपूर: संपूर्ण देशातील ग्रामीण जनतेचा विचार करून त्यांना संभाव्य पाणीटंचाई पासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेली जल जीवन मिशन ही योजना महत्त्वकांक्षी योजना असून ग्रामीण भागातील जनतेला या मिशनचा अधिकाधिक उपयोग होणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले.

उंबरगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत विंधन विहीरीच्या खोदाईच्या कामाचा शुभारंभ खासदार लोखंडे यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया विराज भोसले होत्या. 
याप्रसंगी गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सुप्रिया भोसले या अध्यक्षपदावरुन  बोलताना म्हणाल्या,केंद्र शासनाने ग्रामीण भागातील जनतेचा विचार करून त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून पाणी योजनेवर लक्ष देणारा महत्वाकांक्षी जल जीवन मिशन प्रकल्प आणला आहे,जो ग्रामीण भागातील जनतेसाठी अत्यंत परिणामकारक ठरणारा आहे.जल जीवन मिशन प्रकल्प हा ग्रामीण भागातील जनतेची विशेषत: महिलांची कदर करणारा आहे. साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या उंबरगावची पाणी योजना मागील काही वर्षांपासून प्रतीक्षेत होती.लवकरच विंधन विहीरीचे काम पूर्णत्वास आल्यास शासनाच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेतून गावातील प्रत्येक घराला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यातून खर्‍या अर्थाने शासनाची हर घर नल से जल ही संकल्पना यशस्वी होणार आहे.
सदर योजनेसाठी शासनाने मंजूर केलेले एक कोटी एकाहत्तर लक्ष रुपयांचा प्रकल्पाचा शुभारंभ विंधन  विहिरीच्या खोदाईचे होत असल्याचा आनंद विशेष आहे.प्रामुख्याने या प्रकल्पामुळे गावातील प्रत्येक महिलेच्या डोक्यावरील हंडा उतरणार असून पाण्यासाठीची पायपीट देखील थांबणार आहे, हाही एक वेगळा आनंद असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या.या महत्वाकांक्षी योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील यावेळी संमत करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच नंदकुमार काळे,सामाजिक कार्यकर्ते विराज भोसले,ज्येष्ठ सदस्य राजेंद्र ओहोळ,श्रीरामपूर दूध संघाचे माजी अध्यक्ष यशवंत भोसले,अशोक कारखान्याच्या माजी संचालिका सुधाताई भोसले,शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, किशोर कांडेकर,पोलिस पाटील पंढरीनाथ राऊत,पांडुरंग कोळसे,बाबासाहेब कोळसे,संजय वारुळे,विजय वारुळे, निलेश बनकर,योगेश बनकर,चांगदेव देखणे,धोंडीराम मोरे,गोविंद गायकवाड,भैरव मोरे,गोकुळ कोळसे,सुधीर कोळसे, रणजीत गांगूर्डे,रविंद्र झरेकर,संदीप गुंजाळ,भाऊसाहेब भोकरे, ,संजय राऊत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

*सौजन्य: स्वाभिमानी न्यूज नेटवर्क

close