shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रदीप मकासरे राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित


श्रीरामपूर प्रतिनिधी:
वांबोरी गावचे भूमिपुत्र व आरपीआय आंबेडकर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप प्रभाकर मकासरे यांना शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.

श्रीरामपूर येथील बुद्ध विहार येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आरपीआय आंबेडकर पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

 कॉ. बाबा आरगडे,सुभाषराव गायकवाड, ह .भ. प. दत्तात्रेय महाराज बैरट ,भगवानराव धनगे,  भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे साहेब . सामाजिक कार्यकर्ते शिवस्वराज्य बौद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संजय वाघमारे सचिव रमाताई वाघमारे आदिंच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

यावेळी अतिश मकासरे, नितीन ब्राम्हणे, सूरज मकासरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मकासरे, अमोल शेळके सचिन ब्राम्हणे, सचिन चक्रनारायण, विलास शेळके, गोविंद कांदे आदिंसह मित्र परिवार उपस्थित होते.
close