प्रतिनिधी : महेश चव्हाण

नगर : ९ /  नगर तालुक्यातील देहरे गावातील वार्षिक यात्रा उत्सवात दहशत निर्माण करुन दोघावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवार दि . 7 मार्च रोजी दुपारी घडली आहे.
 
हल्ल्यात ऋषिकेश संजय लांडगे व त्यांचा मित्र विशाल नामदेव करंडे जखमी झाले आहेत. या प्रकरणी राजेंद्र शिवाजी लांडगे‌ (रा. लांडगे वस्ती, देहरे,) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आकाश शिवाजी जाधव (रा. देहरे) व त्यांचे सोबतचा एक अनोळखी  पाहुणा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून  त्यांना अटक करण्यात आली आहे. देहरे येथील यात्रेमध्ये घड्याळ विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला आकाश शिवाजी जाधव व त्यांच्यासोबत चा एक जण दम देत होते. त्यांना का दम देता, अशी विचारणा ऋषिकेश लांडगे व विशाल कारंडे त्यांनी केले असता त्यांच्यावर कोयता व कुदळेने जीवघेणा हल्ला करून जखमी केले .  त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई हंडाळ , गणेश कावरे, दीपक गांगुदे, पोकॉ तांदले करत आहेत.