shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ तंत्रनिकेतनमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त वृक्षारोपण


प्रतिनिधी : असावरी वायकर

नगर : ९ /  चास येथील  आडसूळ तंत्रनिकेतनमध्ये जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व महिलांचा रोपटे  देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर विद्यार्थिनींसाठी व्याख्यानमाला  आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी   सुमित्रा देवकर, प्रतीक्षा चोरमागे यांनी  सहभाग नोंदवून या दिनाचे महत्त्व पटवून दिले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महिला पोलिस उपनिरीक्षक  प्रियंका दादासाहेब आठरे आणि सहकारी   व्ही. बी. कदम  या उपस्थित होत्या. त्यांनी महिला संरक्षण आणि महिला सबलीकरण याविषयी महिलांना आणि विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करून या समाजासाठी काहीतरी करून दाखवले पाहिजे असेही त्या बोलल्या.सोशल मीडिया दुधारी तलवारीसारखा असून, त्याचा योग्य वापर केल्यास त्यासारखे परिणामकारक संदेशवहनाचे दुसरे चांगले माध्यम नाही, असे प्रतिपादन व्ही.बी.कदम  यांनी केले. सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या ज्ञानाचा फायदा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चित होतो. मात्र थोडासा निष्काळजीपणा आयुष्याला वेगळे वळण लावतो, असेही कदम मॅडम यांनी सांगितले. 
 
संस्थेच्या सेक्रेटरी  सौ. लीना आडसूळ यांनी फेमिनिझम म्हणजे काय, कशाला म्हणावे याबद्दल हृदयस्पर्शी वक्त्यव्य करत असताना त्या म्हणाल्या स्त्रीवाद, अर्थात फेमिनिझम हा शब्द वेगवेगळ्या कारणांसाठी इतक्या वेळा वापरला गेलाय की त्या शब्दाचं गांभीर्य कमी होत आहे असे सांगून,  सरसकटपणे कुणीही तो रेटतो आणि अनेकदा त्याचा चुकीचा अर्थ समाजापुढे, खास करून तरुण पिढीसमोर ठेवला जातोय. स्त्रीवाद म्हणजे केवळ पुरुषांना कमी लेखणं नव्हे. स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीचे समान हक्क मिळावेत, यासाठी ही चळवळ आहे. फेमिनिस्ट म्हणजे पुरुषांना विरोध असं अजिबातच नाही. योग्यता, पात्रता पाहून सर्वांना समान संधी मिळायला हवी. हेच खरं 'फेमिनिझम' आहे असे सांगून विद्यार्थिनींना  मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या उत्तराधात विद्यार्थ्यांनी  स्त्री भ्रूण  हत्येवर आधारित नाटक सादर केले ज्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.  

कार्यक्रमानंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम आयोजित  करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा श्री  अनिरुद्ध माणिक आडसूळ, सचिव  सौ. लीना आडसूळ, उपाध्यक्ष मा श्री विश्वनाथ आडसूळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य  रमेश एस गडाख यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्राध्यापिका आकांक्षा म्हस्के यांनी केले.
close