रेड क्रॉस चे वतीने शक्तिवर्धक औषधे वाटप...!
श्रीरामपूर प्रतिनिधी:
बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात मातेची भूमिका महत्वाची असते बालकांचे संगोपन आरोग्यविषयक नियमाने केले तर बालक सदृढ व निरोगी राहील . त्यासाठी मुलांना बालवयात पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे.श्रीरामपूर तालुक्यातील पूर्वीच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण कमी आहे.भविष्यात तालुक्यात कुपोषण निर्मूलन मोहीम सुरू करावयाची आहे त्यासाठी रेड क्रॉस सोसायटी, प्रशासन,सेवाभावी संस्था यांना पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी केले.
जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त तालुक्यातील कुपोषित बालकांना रेड क्रॉस सोसायटीचे वतीने शक्तिवर्धक औषधे मोफत देण्यात आली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रवीण सिनारे मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रवीण सिणारे होते .रेड क्रॉस सोसायटी व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजवलनाने सुरुवात झाली,
स्वागत व प्रास्ताविकात तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांना सकस घरगुती आहार द्या.आपण फास्ट फूडचा वापर केल्याने बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यासाठी मातेने मुलांच्या खाण्या - पिण्याची योग्य काळजी घेतली पाहिजे असे सांगून शासन राबवित असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर रेड क्रॉस चे सचिव सुनील साळवे यांनी रेड क्रॉस च्या कार्याची माहिती दिली.
प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, भरत कुंकुलोळ,डॉक्टर मॅक त्रिभुवन,डॉ. तौफिक शेख, डॉ.स्वप्नील पुरनाळे, श्रावण भोसले, पोपटराव शेळके, सुखदेव शेरे,सोपान नन्नवरे,प्रेम सोनुने,डॉ.प्रशांत शेळके, बाळासाहेब पाटोळे, अवधूत कुलकर्णी, विश्वास भोसले, माया चाबुकस्वार, वर्षा दातीर
आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालकांना प्रोटीन पावडर, मल्टी व्हिटॅमिन,कॅल्शियम,रक्त वाढ आदींची शक्तिवर्धक औषधे मोफत देण्यात आली.
यावेळी डॉ.मॅक त्रिभुवन यांनी औषधे कसे व किती प्रमाणात घ्यायचे हे प्रत्येक बालकाची तपासणीनंतर सांगितले.डॉ. तौफिक शेख यांनी पालकांना सांगितले की मुलांना भरपूर जेवण द्या व वेळच्या वेळी लसीकरण केले तर मुलांची वाढ व शारीरिक विकास लवकर होतो. त्यासाठी योग्य आहार व औषधे घेण्यासाठी पालकांनी लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.
डॉ.मॅक त्रिभुवन व डॉ.तौफिक शेख यांचे औषधांसाठी मोलाचे योगदान होते.
सुत्रसंचलन जयश्री पाटील यांनी तर आभार कल्पना फासाटे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेड क्रॉस चे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आजीव सभासद व बाल विकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक सौ.राजले,सौ.खेडकर,सौ.कासार आदींनी परिश्रम घेतले.
वृतसंकलन: समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

