श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय हे उगडपणे चालू असुन सदरील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावेत याकरीता छावा स्वराज्यरक्षक सेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), भीम गर्जना सामाजिक संघटना यांच्या वतीने येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांना सामुहिक निवेदन देण्यात आले .
याबाबत येत्या आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही होऊन सर्व अवैध धंदे बंद झाले नाही तर संबंधित सर्व संघटनेंच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात गुटखा, मटका (अकडे),जुगार अड्डे,बिंगो,लाल काळा,मन्ना पत्ता अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे हे उगडपणे चालू आहे,शहरात तर किराणा दुकानापेक्षा चौका - चौकात गुटखा,मटका (आकडे), बींगो चे दुकानेच थाटली गेली असल्याचे बघावयास मिळते आहे. त्याबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील अवैध व्यवसायांची कोणतीच कमतरता दिसून येत नाही, बेलापूर बुद्रुक, टाकळीभान,हरेगाव ही गावे तर मटका (आकडे), मन्ना पत्ता, जुगार, गुटख्याचे माहेर घरच बनली आहेत,
अशा या अवैध व्यवसायांवर संबंधित पोलिस प्रशासनाचे कोणताही वचक राहिलेला नसल्याचे दिसून येते आहे.काही पोलिस प्रशासनाचे अधिकारीच अवैध व्यवसायीकांना अप्रत्यक्ष मदत करतात असे बोलले जात असुन करीता शहर व तालुक्यातील सदरील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, जर येत्या आठ दिवसात हे अवैध धंदे बंद झाले नाही तर श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आंबेडकर) युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे यांनी सामूहिकरित्या दिलेल्या निवेदनात दिला आहे, याप्रसंगी छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गायकवाड,छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश भोसले,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष रफिक शाह,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सोनू शेख,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे तालुका संघटक मुनाफ पिंजारी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) तालुकाध्यक्ष श्रीकांत महांकाळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) युवा तालुकाध्यक्ष विकास जगधने आदि मान्यवर उपस्थित होते.

