shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पृसाद गृहनिर्माण संस्था शिक्षक कॉलनी केज येथे राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मंदिराच्या नावाखाली महाठगांचा कोटींचा भ्रष्टाचार..!!

                            ........  

रिकामा ओपन स्पेस विकून कोट्यवधी रुपये ढापणारे महाठग म्हणतात आम्ही सगळा पैसा मंदिराच्या बांधकामासाठी वापरला.                                 

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                       ...................................         ................                         

शिक्षक कॉलनी परिसरातील पृसाद गृहनिर्माण संस्था मधील राष्ट्रसंत भगवानबाबा मंदिराच्या आजुबाजूचा ओपन स्पेस विकुन ढकार दिल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून गाजत आहे. विषेश म्हणजे सदर सोसायटी अवसायनात निघाल्यावर ही ओपन स्पेस ची जागा विकल्या गेली आहे. 


ओपन स्पेस विकाणारांना कुठे कुठे काय काय खावे याचे भान सुद्धा राहिले नाही. राष्ट्रसंत भगवानबाबा मंदिराच्या कामासाठी या भागातील सर्व जणांनी देणगी स्वरुपात मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे. समाजातील सर्वच नेते, अधिकारी, गुत्तेदार व सर्व सामान्य भाविकांनी पण मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे. लाखो रुपये मंदिराच्या बांधकामासाठी जमले होते. त्यातील दोनिक लाख रुपये खर्च करून मंदिर बांधण्यात आले. 

त्या नंतर मंदिराला आज पर्यंत साधा रंग सुद्धा या लोकांनी जमा झालेल्या पैशातून दिलेला नाही. जमा झालेले देवाचे पैसे सुद्धा या महाठगांनी खाल्ले आहेत. वरुन हे बांधकाम आम्हीच केले असा आव आणतात. आणि कहर म्हणजे सदरील ओपन स्पेस विकून जमा झालेले पैसे सुद्धा मंदिरासाठी खर्च केले असे सांगत आहेत. 

जवळपास आठ ते नऊ प्लाट काढून विकले आहेत या महाठगांनी शिक्षक कॉलनी परिसरातील प्लॉटच्या किंमती आमच्या भागात हजार रुपये स्केवर फुट च्या पुढे आहेत. यातून जे लाखो रुपये जमा झालेले आहेत ते सर्व मंदिराच्या बांधकामासाठी खर्च केले असे म्हणतात. म्हणजे हे कलियुगातील रावण देवाला सुद्धा सोडायला तयार नाहीत. 

मी इ आर ऑफिसमध्ये माहिती घेतली असता ओपन स्पेस विकताच येत नाही असे अधिकारी म्हणाले आहेत. हा गैरकारभार करणाऱ्या वरती 420 कलमानुसार फौजदारी गुन्हा नोंद होऊन कडक कारवाई होऊ शकते असे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे.सर्व समाज बांधवांनी हा विषय गांभीर्याने घेऊन अशा लोकांना वेळीच आवर घालणे क्रमप्रात झाले आहे.
close