सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरीकास चांगल्या आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य हक्क राज्यातील नागरिकांना उत्तमरित्या देण्याकरीता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधन - सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून रूग्णशुल्काचा यामध्ये समावेश होतो. सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे. राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत. 0000 |
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

