श्रीरामपूर प्रतिनिधी:
खोकर येथील श्रीचक्रधर आश्रम मंदिर प्रमुख महानुभाव पंथ वाङ,मयाचे अभ्यासक श्रीधरानंदशास्त्री पातुरकर हे एक अभ्यासक,पंथप्रसारक, सेवाभावी व्यक्तिमत्व असून त्यांच्या अभ्यासपूर्ण, दुर्मिळ, दुर्लक्षित महानुभाव लेखनाचे ग्रन्थ प्रकाशित होणे गरजेचे असल्याचे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे खोकर येथील श्रीचक्रधर आश्रम मंदिरात महानुभाव साहित्य आणि संशीधन या विषयावर परिसंवाद व श्रीधरानंदशास्त्री पातुरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ.बाबुराव उपाध्ये बोलत होते. यावेळी सुखदेव सुकळे,केवलमुनी गुंफेकर उर्फ केशव गायकवाड,सुयोग बुरकुले, घन:श्याम कैलास रजपूत कटारे आदी उपस्थित होते.डॉ.बाबुराव उपाध्ये आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेला सर्वप्रथम प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.श्रीरामपूर तालुक्यात या पंथाचे कार्य आणि भक्तीस्थळे पूजनीय आहेत.अशा पंथाचे जुने, जाणते संशोधक, अभ्यासक, साहित्यिक श्रीधरानंदशास्त्री पातुरकर यांचे दुर्मिळ पण दिशादर्शक लेखन प्रकाशित होणे गरजेचे आहे, कारण हे लेखन पुढील पिढीला उपयुक्त ठरणारे आहे.स्व.डॉ.र. बा.मंचरकर यांचे व पातुरकरशास्त्री यांचे घनिष्ठ संशोधन नाते होते,त्यामुळे उपक्रमही खूप होत असत, अशा आठवणी सांगून डॉ.उपाध्ये यांनी खोकर गावाचे महत्व सांगितले. सुखदेव सुकळे यांनी आश्रम, मंदिर आणि सेवाकार्याचा गौरव करत विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सहकार्यहीं मिळेल असेही ते म्हणाले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील उसगांव येथील साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज यांचे महत्व सांगून त्यांच्याविषयी लिहिलेले पुस्तक भेट दिले.डॉ.मंचरकर यांच्या महानुभाव पंथ साहित्य संशोधन महत्व सांगितले या कार्यासाठी लोकसहकार्य लाभावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. श्रीधरानंदशास्त्री पातुरकर म्हणाले, मी १९८२ पासून येथे सेवा करीत आहे. गावाचे सहकार्य आहे. ०४ फेब्रुवारी १२७६ रोजी श्रीचक्रधरस्वामी या पवित्र स्थळी राहिले. असे हे परम चरणांकित भक्तिस्थळ आहे. २०१० पासून मतिमंद असलेल्या घन:श्याम मुलाचा व इतरांचा सांभाळ करीत आहे. मी 'कालनिर्णय 'हॆ संशोधन पुस्तक प्रकाशित केले आहे. घन:श्याम मुलगा वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगल्याजवळील भटाणा गावचा असून त्याच्यावर योग्य उपचार करीत आहे. बाकी साधकांचे वास्तव्य असते. धर्मवत्सल आणि सेवाभावी लोक या सत्कार्याला हातभार लावतात, असे सांगून त्यांनी कार्यचर्चा केली. सत्कार व भेटीबद्दल कौतुक केले.सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

