प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:- केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आ.नामिताताई मुंदडा यांच्या निधीतून आज कानडी माळी येथे विविध योजनेतून विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला या कामांमध्ये
1)सावता मंदिर सभामंडप 07 लक्ष रुपये
2) अंगणवाडी बांधकाम 11.25 लक्ष रुपये
3)दलित वस्ती 05 लाख रुपये
4)गाव अंतर्गत सिमेंट रोड 05 लक्ष रुपये
5)आर.ओ प्लांट
6)आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती
आशा विविध विकास कामांचा शुभारंभ आ.नामिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी गावकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजी ने आ .नामिताताई यांच स्वागत गावकऱ्यांनी केले.
याच बरोबर गावकऱ्यांनी स्व: विमलताई मुंदडा यांच्या स्मृतीस उजाळा दिला व ताईंनी केलेल्या कामांची आठवण करून दिली व आम्ही नामिताताई यांच्या मध्ये आता विमालताई यांना पाहतो अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या , या कार्यक्रमात बोलताना आ नामिताताई म्हणाल्या की मी निवडणुकीमध्ये प्रचारात आपणास जे शब्द दिले होते ते पूर्ण केले.
आणखी राहिलेले विकास कामे नक्कीच मार्गी लावेल गावकऱ्यांच आसच प्रेम कायम ठेवा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आस आश्वासन त्यांनी दिल यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांनी पण आपलं मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणात आ नामिताताई यांच्या कामाचे कौतुक करून केज विधानसभा मतदार संघाला नामिताताई यांच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष व कार्यक्षम आमदार मिळाला आशा भावना व्यक्त केल्या ,तसेच दिलेल्या विकासनिधींची कामे दर्जेदार करावीत आशा भावना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांनी व्यक्त केल्या,या वेळी अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंजीत सिंह पाटील यांनी केज तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर करावी अशा भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव राऊत ,सरपंच अशोक राऊत ,उपसरपंच बालासाहेब राऊत सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक गावकरी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमास केज तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री सुदाम पाटील ,शरद इंगळे,सुरेश नांदे,चोपणे सर, राहुल गदळे संतोष जाधव मच्छिंद्र जोगदंड ,अशोक काकडे, सरपंच भैया मुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.

