माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडीच्या विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदान वनराई बंधारा .
संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग व ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधल्याने विद्यार्थ्यांचे केले कौतुक
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ( ता इंदापूर) विद्यालयाच्या इ. ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी बुधवार दि. १३/०९/२०२३ रोजी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
म्हसोबाचीवाडी हे गाव अवर्षण प्रणव क्षेत्रात येते. पावसाळ्यात पडणार पाणी अडवून जमिनीत जिरवणे व पाण्याचे महत्त्व जाणून व संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या प्रेरणेने व म्हसोबाचीवाडी गावचे सरपंच राजेंद्र राऊत यांच्या साथीने पाण्याचे महत्त्व जाणून विद्यालयाचे मुख्याध्यापक भोंग सर, शिक्षक पानसरे सर, मासाळ सर, सौ.सरक मॅडम व सौ. तावरे मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून बंधारा बांधण्यात आला. विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी अतिशय प्रामाणिक परिश्रम करून गावासाठी एक नवीन संदेश दिला आहे की, प्रत्येक व्यक्तीने पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी व मुलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाणी जमीनीत मुरवावे. पावसाचे प्रमाण खूप कमी आहे याचा विचार करून आणि वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अतिशय मोठा बंधारा बांधला आहे. सर्वांकडून विद्यार्थ्यांवर याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत असल्याचेे दिसून येत आह.