प्रतिनिधी :राजेश बाष्टे

अलीबाग : १५ /    शुक्रवार दि . १५  सप्टेंबर २०२३ रोजी जे. एस. एम. महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने  ‘हिंदी दिवस समारोह साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी भुषविले.  हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मोहसिन खान यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगून हिंदी भाषेमधून मिळणा-या विविध रोजगारांबद्दलची माहीती विद्यार्थ्यांना दिली. हिंदी दिवसाच्या निमित्ताने काव्य लेखन आणि कथा लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. यात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हिंदी दिवस समारोहात या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

 या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. अजय सावंत, सौ. स्नेहा ठाकूर, श्री. प्रवीण पाटील तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मीनल ठाकूर तर आभार प्रदर्शन डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. काव्य लेखन आणि कथा लेखन स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्रा. गणेशा म्हात्रे यांनी सहकार्य केले.