प्रतिनिधी : प्रविण देशमुख
नेवासा : १५ / सौंदाळा-भेंडा ते कुकाणा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत जीवन ज्योत फाऊंडेशनच्या ईशाराची दखल घेऊन संबंधित कार्यालयांनी कार्यवाही केल्याने जीवन ज्योत फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे,असे कमलेश नवले यांनी सांगितले.
नेवासा ते शेवगाव राज्य मार्गवर भेंडा ते कुकाणा दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्याने राज्यमार्ग दुरअवथ्या झाल्याने जीवन ज्योत फाऊंडेशन ने आवाज उठवून रस्ता दुरूस्ती साठी ईशारा दिला होता. यांची सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअधिकारी अभियंता यांनी दखल घेत डांबर व खड्डी टाकून रस्तावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
नेवासा फाटा ते शेवगाव राज्यमार्ग जात असल्याने सौंदाळा-भेंडा ते कुकाणा या किमी च्या अंतरात गेल्या काही दिवसांपासून राज्य मार्गावर मोठमोठे असंख्य खड्डे पडल्याने वाहन धारकांना कसरत करावी लागत होती. खड्डे हुकविण्याच्या नादात अनेक अपघात घडत होते.या मोठ्या वर्दळीच्या मार्गवर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.जीवन ज्योत फाऊंडेशन ईशारा दिल्या नंतर अवघ्या दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत सौंदाळा-भेंडा ते कुकाणा या राज्य मार्ग दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे.अखेर जीवन ज्योत फाऊंडेशन च्या पाठपुराव्यात यश आले.

