shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चोंडी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या बांधवांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पाठिंबा.

चोंडी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या बांधवांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पाठिंबा.
इंदापूर प्रतिनिधी: चोंडी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी गेले ९ दिवस आमरण उपोषणास बसलेल्या बांधवांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
 यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात, प्रविणजी डोंबाळे, सद्दाम भाई बागवान ,RJ साबळे हे उपस्थित होते. 
या वेळी अनिताताई खरात यांनी उपोषणाला बसलेले  अण्णासाहेब रुपनवर, सुरज बंडगर या वडीलधाऱ्या बांधवांना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.तसेच शासनाने समाज्याचा अंत पाहू नये, आज राज्यात २ नंबरची आमची लोकसंख्या असुन आमदार,खासदार किती आहेत ,आमचे बांधव अजुन ही रानावनात ऊन वारा पाऊस डोक्यावर घेत,लहान मूल घेऊन राना वनात राहतात याचा विचार करून शासनाने आम्हाला जे घटनेत आरक्षण दिले आहे. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.ही तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने विनंती केली .
यावेळी मा.राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे  ,मा बाळासाहेब दोलतडे माजी अध्यक्ष शेळी मेढी महामंडळ हे व इतर बांधव उपस्थित होते.
close