*अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व व राष्ट्रीय एकता दिवस साजरा* 

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
शैक्षणिक बातमी 

अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
  शाळेतील विद्यार्थीनींसाठी रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थीनींनी स्पर्धेत सहभाग घेतला.

      तदनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवस  साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य झेड.एम.गवळी,जे.पी.सोनवणे,मनेष माळी, उमेश माळी होते.प्रथमत: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उमेश माळी , प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.विजय ठाकरे,प्रा.प्रविण पगारे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर व राष्ट्रीय एकता दिवस बद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजय ढोले यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक संदिप पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.