shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बबनराव शेळके यांचा मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

 भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक (उपाध्यक्ष-) बबनराव शेळके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असून महाराष्ट्रातील मराठा समाज हा रस्त्यावर आज उतरलेला आहे.

 मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झालेला असून  मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकोपलेला आहे .आज जर मराठा समाजाला आरक्षण असतं तर अनेक युवक ही चांगल्या हुद्द्यावर चांगल्या नोकरीला असते ,त्याचबरोबर कॉलेजमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे मार्क असून सुद्धा हुशार मुलांचा कॉलेज मध्ये डिप्लोमा ,इंजीनियरिंग ,डॉक्टर, पदावरील ऍडमिशन मिळाले नाहीत ,नंबर लागले नाहीत हा एक प्रकारे मराठा समाजावर होणार अन्यायाचा आहे .म्हणून मराठा समाजाने राज्यव्यापी जे आंदोलन हाती घेतले त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून मी माझा राजीनामा आमचे आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय गणेश काका जगताप यांच्याकडे पाठवलेला असून तो त्यांनी स्वीकारला अशी सुद्धा त्यांच्याकडे विनंती भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक (उपाध्यक्ष) बबनराव शेळके यांनी केलेली आहे
close