आम्ही सारे एक आहोत अडचण फक्त राजकीय दुकानदारी मांडून बसणाऱ्यांची
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
विशेष बातमी
अंतवरली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ राहाता तालुका सकल समाजाने शिर्डी येथे सुरु केलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणास शिर्डीतील बहुजन समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व बारापगड व बहुजन समाज जातीधर्मातील बांधवांनी भेटी दिल्या यावेळी साईबाबांच्या 'सबका मालिक एक" ह्या संदेशाचा अभिमान वाटतो व बाबांच्या शिकवणीच पालन शिर्डीत होतं असे मराठा बांधवांनी स्पष्ट केले. शिवरायांनी आठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची महर्तमेढ रोवली होती शिवरायांच्या इतिहासाची ही साक्ष आहे आणि आम्ही सारे एक आहोतमात्र अडचण ही राजकीय दुकानदारी मांडून बसलेल्या काही स्वार्थी राजकीय नेत्यांची आहे. मराठ्यांच्या या लढयात अशीच साथ सोबत असू द्या असे सुतोवाच यावेळी सचिन चौगुले यांनी भेटीला आलेल्या समाजबांधवाशी केला.
याप्रसंगी नानासाहेब काटकर, रमेश बनकर, संपत जाधव, नितिन धीवर, ज्ञानेश्वर हातांगळे, मा. नगरसेवक सुरेश आरणे, अँड अविनाश शेजवळ, सुनिल परदेशी, वैभव सोनवणे, इंजी प्रवीण बनकर, सचिन तांबे, गफार खान पठाण, हिम्मतराव होळकर, नानासाहेब शिंदे पत्रकार संजय महाजन आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

