सौरभ कामडी - पालघर

मुरबाड - सरळगाव विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त फटाकेमूक्त दीपावली साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.

दीपावली सणाचा पहिला दिवस वसुबारस किंवा वाघबारसने सुरु झाल्याने सर्वत्र आनंदाचा रोषणाईचा उत्सव असल्याने दिवाळी या सणात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला जातो पण फटाके वाजवल्यामुळे ध्वनीचे, हवेचे, प्रदूषण होण्याने अनेक आजार उद्भवू शकतात त्यामुळे आपले व इतरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून सरळगाव विभाग हायस्कूल मधील दुपार सत्रातील विद्यार्थ्यानी फटाके न वाजवण्याची शपथ घेतली असून पर्यावरणास कोणताही धोका आपण होऊ देणार नाही व इतरांही फटाके वाजवण्यापासून प्रवृत्त करू अशी ग्वाही दिली
    यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. ओ.माळी सर यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले व  दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दुपार सत्रप्रमुख संजय इधे सर यांनी पर्यावरणमुक्त दीपावली फटाके न वाजवण्याची जाणीव करून देत जनजागृती म्हणून प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली.

*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111