श्रीकृष्ण वाजवी पावा
गायवासरे धावत
वसुबारस संस्कृती
आहे कृषी संस्कृतीत
भारतभूमी पवित्र
करी प्राणी,पक्षी प्रेम
निसर्ग आहे दैवत
गाय आहे चाऱीधाम
होते पक्षचिन्ह पुण्य
लोकशाही भारताची
मानले पवित्र धन
पूजा गायवासराची
कृषी संस्कृती देशाची
जगते त्यावऱी जग
कोरोना काळात जागी
फक्त शेती ही सजग
दूध, दही, लोणी, तूप
आहे सात्विक हॆ अन्न
सात्विक विचार जागे
मन राहते प्रसन्न
वसुबारस संस्कृती
सांगे मानवाला प्रेम
जगा आणि जगू द्यावे
सत्य, शिव, सुंदरम
वसुबारस विचार
आहे माणुसकी देव
प्रेमाने राहू सगळे
नको करू भेदभाव
वसू म्हणजे ही गाय
बारस बारा दिवस
गायवासराची पूजा
लक्ष्मी येणार ही खास
श्रीकृष्ण व बलराम
पराक्रमी ते अग्रणी
दूध,लोणी होते अन्न
बुद्धिमान, शुद्ध वाणी
आहे दीपावली देशी
शरीर निरोगी नीती
अर्थ सांगते सर्वांना
वसुबारस संस्कृती !
=डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर 9270087640

