श्रीरामपूर प्रतिनिधी:
शिक्षण व खेळ यांना जीवनात सारखे महत्त्व आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळ व व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे.खेळ हा निरोगी व आनंदी जीवनाचा मंञ असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोकनगर येथील अशोक कारखाना संचलित अशोक आयडियल स्कूलने स्कूलच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित  वार्षिक क्रीडा महोत्सवाचे माजी आ.मुरकुटे यांचे हस्ते शुभारंभ झाला.त्याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते.याप्रसंगी कारखाना संचालक रामभाऊ कसार,राजेन्द्र रायकर,डांगेमामा,मेजर कांबळे,भैरव कांगुणे,सतिश आहेर,अनिल फोपसे,तायडे सार,निरज मुरकुटे, स्कूलचे प्राचार्य रईस शेख उपस्थित होते. 
 श्री.मुरकुटे म्हणाले की,अभ्यासा इतका खेळ व व्यायामाचा ध्यास महत्त्वाचा आहे.खेळामुळेच मी स्वतः निरोगी व आरोग्यदायी जीवनाचा अनुभव घेऊ शकलो.विविध व्याधीपासून बचाव करुन जीवन आनंदी व निरोगी  जगायचे असेल तर खेळ व व्यायामाला पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय,राज्य,जिल्हा व तालुका पातळीवर नावलौकिक मिळविणा-या स्कूलच्या गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी आध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111