प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
केज शहरातील शिक्षक कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षक कॉलनी परिसरातील गायकवाड दांपत्याने यावेळी पुढाकार घेतला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एम. डी. घुले सर यांनी आपले अमुल्य विचार व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर शिक्षक कॉलनी मधील जिल्हा प्राथमिक शाळेला संविधान भेट देऊन गायकवाड दाम्पत्याने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
सदरील कार्यक्रमामध्ये गायकवाड संदिपान, गायकवाड महानंदा व गायकवाड प्रशांत यांच्या तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तर शाळेसाठी संविधान भेट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पञकार प्रकाश मुंडे, पञकार रंजीत घाडगे, एम. डी. घुले सर, संदिपान गायकवाड, महानंदा गायकवाड, प्रशांत गायकवाड, किरण वाघमारे, कृष्णा आकूसकर व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जाधवर मॅडम , मुंडे मॅडम व राजश्री मुंडे यांनी सुरेख रित्या केले होते.

