शिरसगांव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगांव येथील संत तेरेजा चर्च येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


दिनांक २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. रांगोळी स्पर्धा,रात्री १० वा. नाताळगीते,१०.५० वा पवित्र संगीत मिस्सा,दि २५ सकाळी ८ वा.पवित्र मिस्सा, दि २६ रक्तसाक्षी संत स्टीफन स्मृतिदिन, सायंकाळी ६ वा.नातल गीत स्पर्धा, दि.२७ सकाळी ११ वा.वृद्ध भाविकांसाठी पवित्र मिस्सा,व बाबासाहेब सोनावणे  प्रितीभोजन,दि २८ निष्पाप बालक दिन व सायंकाळी ५ वा. कॅण्डल मिरवणूक,दि २९ संत बेकेट स्मृतिदिन,दि ३१ डिसेंबर-पवित्र कुटुंबाचा सण,७.३० वा. पवित्र मिस्सा [संत लुक विभाग] ९.३० पवित्र तास. रात्री १०.३० वा.पवित्र संगीत मिस्सा,दिनांक १ जानेवारी २०२४ सकाळी ८ वा.पवित्र संगीत मिस्सा, या सर्व कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ,सचिन मुन्तोडे,रिचर्ड अंतोनी,व सर्व धर्मभगिनी, ग्रामस्थ यांनी केले आहे.तसेच दि २३ डिसेंबर रोजी संत तेरेजा बॉईज हायस्कूलचे प्राचार्य फा.डॉमनिक रोझारिओ हे सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती सोहळा महागुरुस्वामी लूरडस डानियल व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद कर्मचारी,यांनी केले आहे.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111