अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
इंडियन रेडक्रॉस जिल्हा शाखेच्या सभासदांच्या सर्वसाधारण सभा १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सभेमध्ये नोंदणीकृत सभासदांची पडताळणी करुन पत्ते, मोबाईल क्रमांक, फोटो संकलित करुन यादी अद्यावत करणे, संस्थेची नियमावली तपासुन सदस्य नोंदणीबाबत चर्चा, जिल्हा शाखेचे पदाधिकारी निवडण्याबाबत करावयाची कार्यवाही, १२ सभासदांचे प्रस्ताव राज्य शाखेकडे पाठविणे आदी विषयांवर या सभेमध्ये कामकाज होणार आहे.
बैठकीस रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे नोंदणी प्रमाणपत्र व ओळखीचा पुरावा असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचेही प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

