shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष पथकांची स्थापना...


*अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास माहिती देण्याचे आवाहन*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात मद्य सेवनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 

या कालावधीमध्ये अवैध, परराज्यातील,बनावट मद्य विक्रीची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने सात विशेष पथकांची नेमणूक करुन या पथकांमार्फत बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
२५ डिसेंबर २०२३ रोजी नाताळ सण व ३१ डिसेंबर २०२३ रोजी नववर्षाच्या स्वागातासाठी हॉटेल्समध्ये मोठया प्रमाणात मद्य सेवन कार्यक्रमाचे आयोजित केले जातात. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एक दिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती देण्याची तरतुद नियमात असल्याने हॉटेल मालक, चालकांनी आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क शासन जमा करुन एक दिवसीय तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती प्राप्त करावी. मद्यसेवन परवान्याशिवाय मद्य सेवन,विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. मद्यसेवन परवाने ऑनलाईन पध्दतीने www.exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करुन प्राप्त करता येईल.
अवैध मद्यविक्री होत असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉटसअप क्र. 8422001133 अथवा 0241-2470860 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close