shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते उदघाटन संपन्न


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगाव रोड अहमदनगर येथे  जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2023 चे उदघाटन  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील डी.शिंदे, सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी,  आयटीआयचे प्राचार्य खालिद जहागीरदार, उपप्राचार्य एस व्ही जाधव आदी उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन प्रदर्शनात उत्कृष्ट असे प्रोजेक्ट सादर केले आहेत. प्रोजेक्ट तयार करताना तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत  ग्रामीण भागातील युवकांनी त्यांच्या बुध्दीचा व कल्पकतेचा वापर करून हे सर्व प्रोजेक्ट जिल्हास्तरावर सादर केले आहेत. भविष्यात यामध्ये आणखीन सुधारणा करत राज्यस्तरावर जिल्ह्याच्या प्रोजेक्टची निवड होऊन जिल्ह्याचा नावलौकिक होण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील डी.शिंदे म्हणाले या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्वच प्रोजेक्ट हे खुपच वेगवेगळे आहेत. आजपर्यंत अनेक तंत्र प्रदर्शन पाहिले परंतु ऐवढे भव्य व उत्कृष्ट प्रोजेक्टचा सहभाग असणारे पहिलेच तंत्र प्रदर्शन आहे. हे सर्व प्रोजेक्ट येथे येताना तालुक्यातील सर्व प्रोजेक्टमधून निवड झालेले आहेत त्यामुळे जिल्हास्तरावर सहभाग घेताना त्यात परत सुधारणा करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य खालीद जहागिरदार यांनी केले. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या ३९ प्रोजेक्टपैकी एकुण दहा क्रमांक काढून राज्यस्तरावर पाठविले जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक अॕन्टी थेफ्ट लॉक शासकीय आय. टी. आय. जामखेड ,द्वितीय क्रमांक अॕन्टी स्लीप अलार्म शासकीय तांत्रिक विद्यालय,नेवासा,व तृतीय क्रमांक ड्रेस मेकिंग कलाकृती शासकीय आय. टि. आय. श्रीगोंदा यांच्या प्रोजेक्ट ला मिळाला.
परीक्षक म्हणून करंजूले डी. बी., उपप्राचार्य एस्. व्ही. जाधव, एन. टि. जाधव, ठाणगे ए. जी. यांनी काम पाहिले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जालिंदर खाकाळ व चेतन गायकवाड यांनी केले.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close