वडापुरी श्रीनाथ  विद्यालय येथे निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, पुणे अंतर्गत महिला हिंसाचार विरोधी  पंधरवडा अभियान.
इंदापूर प्रतिनिधी: दि.५ डिसेंबर   वडापुरी श्रीनाथ  विद्यालय येथे निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, पुणे अंतर्गत महिला हिंसाचार विरोधी  पंधरवडा अभियान राबविण्यात आले. 
निर्माण संस्था हि भटक्या विमुक्त जमातींच्या हक्क व अधिकारासाठी २००६ सालापासून उपेक्षित समाजातील महिला आणि मुलांना आधार देण्यासाठी काम करत आहे. गेल्या चार वर्षांत, लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या ५०० हून अधिक महिला आणि बालकांना मानसिक-सामाजिक आणि कायदेशीर आधार देण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्हा आणि राज्य विधी सेवा सहाय्य प्राधिकरण, महिला आणि बाल विभाग, राज्य महिला आयोग आणि इतर यासारख्या विविध भागधारकांसोबत सहयोग करत आहे.
दरवर्षी जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडाच्या निमित्ताने १६ दिवस निर्माण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या पाच  वर्षापासून पुणे जिल्ह्यात हे १६ दिवसाचे अभियान राबवत आहोत. या वर्षाची थीम आहे “न्यायाचा प्रवास- अधिकारांबद्दल बोला” या थीमला घेऊन २५ नोव्हेबर ते १० डिसेंबर २०२३ रोजी हे अभियान राबवणार आहे. त्यामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, फिल्म शो, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, प्रशिक्षण, चर्चासत्र, रैली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत जेणे करून महिला हिंसाचाराबाबत समाजामध्ये संवेदनशीलता वाढावी व अन्याय व अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे.
 विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थिती सह कार्यक्रम घेण्यात आला.  
यावेळी *महिला हिंसाचार, बाल विवाह, स्त्रि पुरुष समानता, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मा. मुख्याध्यापक तपासे , शिक्षिका थोरात मॅडम, शिक्षक खताळ सर  उपस्थिती सह कार्यक्रम घेण्यात आला. निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, पुणे च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.