महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमसाखर मध्ये महामानवाला अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम (सिद्धार्थ नगर) निमसाखर येथे दया भोसले (महासचिव, बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुका) यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. बाबासाहेबांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी दिलेले योगदान देशच नाही तर जगापुढे आदर्श ठरले आहे, बसाहेबांनी केवळ अस्पृश्यता निवारण एवढेच नाही तर महिला,बाल,शिक्षण, न्याय अश्या विविध क्षेत्रात योगदान दिले आहे अशा या महामानवाच्या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते ग्रामपंचायत कार्यालय या मार्गाने कॅण्डल रॅली आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमांमध्ये समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता व त्यातून एकीचे दर्शन घडून आले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी निमसाकर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील, सुदर्शन रणवरे, अमोल खरात ,
बबलू भोसले,सचिन भोसले ,जितेंद्र भोसले ,विशाल भोसले, मयूर खुडे, अतुल भोसले विकास बनसोडे इत्यादी उपस्थित होते

