पाथर्डी शहरातील नगरपरिषद अंतर्गत प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी नगरपरिषदवर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

वजीरभाई शेख / पाथर्डी
पाथर्डी शहरातील नगरपरिषद अंतर्गत नवीपेठ येथील प्रमुख प्रलंबित रस्त्यांच्या कामासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (ठाकरे गट) व आम आदमी पार्टी तर्फे भीक मांगो आंदोलन व नगरपरिषदेवर शहर बचाव विकास बचाव (हल्लाबोल) आंदोलन करण्यात आले, यावेळी शहरविकासासाठी भीख मागून आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील नागरिकाकडून एक एक रुपयाची वर्गणी घेऊन ती नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये अर्पण करण्यात आली, व नगरपरिषदेचा निषेध करण्यात आला,


पाथर्डी नगरपरिषदेच्या मागील पाच वर्षातील पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे व बेजबाबदार कारभारामुळे पाथर्डी शहराला अकाली बकाल स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मकरित्या नगरपरिषदे कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड व मुख्याधिकारी यांची खुर्ची वरील मजल्यावरून खाली फेकण्यात आली, आंदोलनासाठी नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला, शहरातील रहिवासी, नागरिक आणि व्यापारी  यांचे मोठे समर्थन लाभले,
या आंदोलनामध्येराष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस  प्रतापराव काका ढाकणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाथर्डी तालुकाध्यक्ष नासीर शहानवाज शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर पाटील राजळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जालिंदर काटे सर, पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवींद्र पालवे ,आप पक्षाचे जिल्हा संयोजक किसनराव आव्हाड, शिवसेना (ठाकरे गट) पाथर्डी शहर प्रमुख भाऊसाहेब धस, सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ पाखरे, माजी नगराध्यक्ष ॲड्.  दिनकरराव पालवे,माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे , हाजी हुमायूनभाई आतार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सिताराम पाटील बोरुडे, पाथर्डी तालुका  काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष गणेश दिनकर, सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गरजे पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश रासने, राष्ट्रवादी युवक पाथर्डी शहर अध्यक्ष देवा पवार, नगरसेवक चांदभाई मणियार, नगरसेवक चंद्रकांत भापकर, युवा नेता आतिश निराळी, उद्धव दुसंग पाटील, मनोजशेठ ढाकणे आदिंसह अनेक पदाधिकारी व सहकारी मित्र उपस्थित होते.
या आंदोलनाला शहरातील नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला, शहरातील लोकांकडून प्रत्येकी एक रुपया भीक मागून आंदोलनाच्या रूपाने जमा केले व ते नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये शहर विकासासाठी अर्पण करण्यात आले.

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*