श्रीरामपूर प्रतिनिधी:
इंडियन मेडिकल असोसिएशन ची अखिल भारतीय परिषद नुकतीच केरळ राज्याच्या त्रिवेंद्रम याठिकाणी दि.२७ व २८ डिसेंबर रोजी संपन्न झाली. यामध्ये सन २०२२-२३ चे इंडियन मेडिकल एसोसिएशन (आय एम ए) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे यांचा उत्कृष्ट अध्यक्षपदाने सन्मान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या सन्मानबद्दल राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे शुभेच्छापर अभिनंदन केले जात आहे.
डॉ. रविंद्र कुटे हे सन २०२२-२३ या साली इंडियन मेडिकल एसोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय कालावधीत लक्षणीय कार्य झाले. यात सदस्य संख्या वृद्धि, गाव दत्तक योजना, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वैद्यकीय विद्यार्थी, आणि कनिष्ठ डॉक्टर संघटना यात नवीन सदस्य भरती, वार्तापत्र, नवीन शाखा काढणे, आय एम ए बाबत जागृती
परिसंवाद, अवयव दान चळवळ, क्षयरोग रुग्ण, दत्तक योजना, आषाढी वारी यात मौलिक सहभाग, संवाद कौशल्य कार्यशाळा, नेतृत्व विकास कार्यशाळा, शाखा सक्षमीकरण, विविध शाखांना भेटी व चालना या सर्वाची दखल घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद कुमार अग्रवाल यांच्या हस्ते तसेच डॉ अशोकन, डॉ अनिल नायक, डॉ शिवकुमार उत्तूरे, डॉ जयेश लेले, डॉ क्षितिज बाली, डॉ सहजानंद प्रसाद सिंग यांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
त्यांच्या या सन्मानबद्दल समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, इंजि.मोहसिन शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.
*पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

