shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खोकर येथे श्रीराम मंदिर अक्षदा कलशाचे मोठ्या उत्साहात स्वागत व मिरवणुक संपन्न....

भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपुर तालुक्यातील खोकर येथे अयोध्या नगरीहुन आलेल्या श्रीराम मंगल अक्षदा कलशाचे उत्स्फूर्त स्वागत करुन गावात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामघोषाने परीसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
गावातील श्रीराम मंदीर प्रांगणातुन श्रीराम मंगल अक्षदा कलश मिरवणुकीस खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ देवस्थानचे मठाधिपती भागवताचार्य ह.भ.प. सेवानाथ महाराज व पुरोहीत दत्तागुरु जोशी यांच्या हस्ते पुजन करुन टाळ मृदुंगाच्या गजरात प्रारंभ करण्यात आला.आपल्या डोक्यावर कलश घेत महीला, पुरुष व लहान मुलांनी प्रभु श्रीरामांचा जयघोष केला.  यावेळी उपस्थित महीलांनी पंचारती ओवाळत अक्षदा कलशाचे पुजन करत दर्शन घेतले. या मिरवणुकीच्या स्वागतासाठी महीला सुवासिनींनी आपापल्या दारासमोर सडा समांर्जन करत रांगोळ्या घालुन परीसर मंगलमय केला होता. हि मिरवणुक ग्राम प्रदक्षिणा करत ग्रामदैवत श्री क्षेत्रगोरक्षनाथ मंदीर येथे सांगता होत संपन्न झाली.
यावेळी दत्तात्रय जाधव, पंढरीनाथ सोमवंशी, अशोक काळे, एकनाथ सलालकर, अशोक थोरात, पांडुरंग काळे, मच्छिंद्र शेरकर, अशोक पटारे, सुनिल सलालकर, सुदाम गव्हाणे, सचिन गाडेकर, प्रमोद लबडे, ज्ञानदेव काळे, दत्तात्रय आरांगळे, बाबासाहेब मंडाळके, रावसाहेब चक्रनारायण, मच्छिंद्र काळे, रावसाहेब शेरकर, सुरेश काळे, दिलीप मोरगे, प्रकाश होले, बापुसाहेब डोळस, सागर जाधव, दिनेश सलालकर, राजेश काळे, अक्षय घावटे आदिंसह  गावातील श्रीराम तरुण मंडळाचे सदस्य, भजनी मंडळ, महीला, पुरुष व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खोकर येथे मंगल अक्षदा कलशाचे स्वागतप्रसंगी भागवताचार्य सेवानाथ महाराज समवेत भजनीमंडळ व महिला, पुरूष व ग्रामस्थ दिसत आहेत.

पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close