*वजीर शेख/ पाथर्डी*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने "शिवराय मनामनात शिवराय घराघरात" ही संकल्पना घेऊन आमदार निलेश लंके यांच्या वतीने गावोगावी जाऊन प्रचार व प्रसार कार्यक्रम होत आहे. यावेळी शिवस्वराज्य यात्रेचे पाडळी गावात आल्यावर पाडळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवस्वराज्य टीम लीडर प्रणाली पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या विषयी माहिती दिली तसेच संकेत तंबाखे यांचे व्याख्यान झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्रीय विचार,शिवरायांचे पारदर्शी प्रशासन, शेतकऱ्यांविषयी शिवरायांचे धोरण, अर्थशास्त्रीय विचार, तसेच तरुणांना प्रेरणा देणारे, असे शिवचरित्र लोकांना समजावून सांगितले.
स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी सर्व धर्मीय मावळ्यांना एकत्र करून स्थापन केले असे आपल्या व्याख्यानातुन सांगितले.यावेळी आदित्य टोळे, आदित्य बावनगडे, नागसेन अंभोरे, तेजश लोंढे, प्रकाश कचरे, राजेंद्र क्षिरसागर, भानुदास गर्जे, बाळासाहेब राऊत, श्रीकांत कचरे, गणेश साळुंके, विशाल कांबळे, धोंडीराम बांगर,व आदि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

