इंदापूर कृषी महोत्सव दि.२४ ते२८ जानेवारी दरम्यान होणार पाच दिवस ....सभापती विलासराव माने यांची माहिती .
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजन.
इंदापूर: - कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरने मुख्य बाजार इंदापूर शिवलिलानगर, डाळींब मार्केट, अकलूज रोडलगत इंदापूर कृषी महोत्सव-२०२४ अंतर्गत बुधवार, दि. २४ ते २८ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्हातील एकमेव घोडे बाजाराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असलेची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार यशवंतराव माने व माजी सभापती
आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धा उद्घाटन २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आमदार यशवंतराव माने यांचे हस्ते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे
यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर समारोप, बक्षीस वितरण समारंभ खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत २८जानेवारीला सकाळी होणार आहे. इंदापूर कृषी प्रदर्शनास प्रवेश मोफत आहे. तसेच शेतमाल उत्पादनातील अग्रेसर प्रगतशील शेतकरी व नियमित शेतमाल खरेदी-विक्रीचे उत्कृष्ठ व उच्चांकी कामकाज करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणेकरीता त्यांचा यथोचीत सत्कार केला जाणार आहे. यावेळीबाजार समितीचे संचालक दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके, संदिप पाटील, रुपालीताई वाबळे, मंगलताई झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
*इंदापूर कृषी महोत्सव- २०२४ अंतर्गत कृषी प्रदर्शनात पाहणार*
बाजार समितीचे इंदापूर कृषी महोत्सव- २०२४ अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे- साधने, ऑटो मोबाईल्स, गृहउपयोगी आवश्यक वस्तु तसेच शेती कृषी अनुशंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार तसेच घोडे चाल (वाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण आहे.
*मनोरंजनाचेही कार्यक्रम होणार*
डॉग शो प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. शालेय विद्याथ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष-मुलांसाठी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम तसेच मुली महिलांसाठी मोनाली करंदीकर यांचा फुल टु धमाल व खेळ पैठणीचा हा सुप्रसिद्ध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लहान व प्रोढांसाठी मनोरंजनाचे खेळ व खवय्यांसाठी खाऊगल्ली असे शिस्तबद्ध नियोजन केले जाणार आहे. तसेच इंदापूर शहर नवीन प्रशासकीय इमारतीपासून विद्यार्थी व नागरिकांसाठी पाच दिवस सकाळी १० ते रात्रौ १० पर्यंत मोफत बससेवा सुविधा असे प्रदर्शनाचे नियोजन आहे. तसेच चालू वर्षी नव्याने अश्वरोहणातील ऑलिम्पिक क्रीडाप्रकार प्रात्यक्षिके, महाराष्ट्र लोककला, बुलेट रायडींग असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.

