अमरावती:-
शुक्रवार दिनांक 19/01/2024 रोजी जिल्हा सामान्य रूग्णालय अमरावती येथे आयुष्यमानभव भारत मिशन अंतर्गत डाॕ. गाढवे साहेब सहा. संचालक अकोला यांच्या आदेशान्वये व डाॕ. शरद जोगी साहेब जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनात अंडवृध्दी रूग्ण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 15 रूग्ण भरती करण्यात आले होते.
तपासणीअंती 12 रूग्ण शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले .त्यापैकी 9 रूग्णावर डाॕ.राऊत साहेब व डाॕ. चाकोरे साहेब (सर्जन) यांच्या अथक परिश्रमाअंती शस्त्रक्रिया करण्यात आली.व 3 रूग्णाची शस्त्रक्रिया उद्या करण्याचे प्रस्तावित आहे . या प्रसंगी श्री. दिनेश भगत साहेब जिल्हा हत्तीरोग अधिकारी अमरावती , डाॕ. जुनेद साहेब , श्री.वावरे साहेब , श्री.तोंडरे साहेब श्री. दातीर , श्री.राठोड, श्री.माहुरे, श्री.बरडे, श्री. मनोहर, श्री.सोमवंशी, श्री. झाडे, श्री.वानखडे, श्री.चव्हाण, श्री.दिवाण इत्यादी कर्मचारी उपस्थित होते .

