shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मध्ये कॉंग्रेस पक्षाची विभागीय व जिल्हा आढावा बैठक संपन्न...!


अमरावती प्रतिनिधी:
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची अमरावती विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक काँग्रेस भवन अमरावती येथे आज पार पडली. 
या बैठकीस काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित राहून अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम, बुलढाणा यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत येत्या लोकसभा निवडणूकी संदर्भात आढावा घेतला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार  नानाभाऊ पटोले यांनी या विभागीय बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भातील सर्वच्या सर्व जागी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री यशोमतीताई ठाकुर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्यासह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटलचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी-स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close