shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अर्ली बर्ड प्री स्कूलचे नियोजन पाहून अक्षरशः भारावून गेले - गटशिक्षणाधिकारी सामलेटी

श्रीरामपूर प्रतिनिधी :
अंजना फाउंडेशनच्या अर्ली बर्ड प्रि स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, किशोर बनसोडे, माळवाडगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ शंकरराव मुठे, लोकसेवा विकास आघाडीचे गणेश छल्लारे, अशोकचे संचालक बाबासाहेब आदिक, माळवाडगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने, पोलीस पाटील दत्तात्रय मुठे, मधुकर बनसोडे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. 

अर्ली बर्ड प्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुयोग्य नियोजन 
त्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले उत्कृष्ट नृत्य, वकृत्व, तथा अप्रतिम असे उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पाहून आपण अक्षरशः भारावून गेल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी केले.
तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजी जासूद होते. संस्थेच्या प्राचार्या चित्रा आसने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संस्थेचे मार्गदर्शक योगेश आसने यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. 
याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले. 

यावेळी बाजीराव आसने, कारेगाव भागचे संचालक शिवाजी मुठे,शेषराव मुठे, गोरख दळे, नितीन बोर्डे, नवनाथ भोंडगे, मारुतीराव मुठे, सतीश आसने,अमोल मोरे, प्रदीप आसने, राजेंद्र आसने, अंकुश आसने, प्रसाद जगरुपे, बापूसाहेब आसने, अमोल आदिक, संकेत आदिक, संजय खताळ, नाना थोरात, दिलीपराव हुरुळे, दिनकर बनसोडे, सतीश आसने, अतिश आसने, भाऊसाहेब आसने, सुधीर आसने, इंजी. निलेश आसने, पत्रकार संदिप आसने, रवींद्र आसने, शिक्षिका सोनाली मुठे,निकिता मुठे,राणी पटारे, वंदना शिनगारे यांच्यासह विद्यार्थी ,पालक, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी कासार व तन्वी गवारे यांनी केले तर योगेश आसने यांनी आभार मानले. 

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close