shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहयो च्या कामांत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा - सभापती प्रदिप वाघ


*तहसिलदारांना पत्र तथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन*

सौरभ कामडी / पालघर
म.न.रे.गा अंर्तगत मोखाडा तालुक्यात ठिकठिकाणी रोजगार हमी योजने कामांच्या मार्फत नागरिकांना रोजगार मिळत असून कायमस्वरूपी कामांची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांमध्ये काहिशी नाराजगी बघायला मिळते आहे, त्यातच पंचायत समिती मोखाडा सभापती प्रदीप वाघ यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी दौरा सुरु केला आहे,

या दौऱ्यात नागरिकांना विविध समस्या जाणवत असल्याचे निदर्शनास दिसून आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये मजुरांचे जॉब कार्ड ,बँक खाते लिंक,मजूरी रक्कम इतर खात्यात जमा होणे,बँक केवायसी, आधारकार्ड समस्या अशा विविध समस्या समोर आल्या असून त्यासाठी तत्काळ बैठक आयोजित करुन त्यावर उपाय काढण्यात यावा तसेच कामात वन विभाग,सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम यंत्रणेची कामे समाविष्ट करावे असे पत्र तहसीलदार मोखाडा यांच्याकडे देण्यात आले आहे.

त्यात सर्व विभागाचे खातेप्रमुख, ग्रामसेवक,रोजगार सेवक,बँक अधिकारी यांची तातडीने बैठक आयोजित करुन सदर समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणी प्रदीप वाघ यांनी केली आहे.

*सौरभ कामडी - पालघर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close