-पत्रकार गोकुळ पवार यांना उत्कृष्ट वार्ता आणि विकास व शाश्वत वार्ता पुरस्कार-
शिरूर कासार (प्रतिनिधी) : उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२२-२३ चे पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ विचारवंत, मा.कुलगुरू प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे व उदगीर येथील जेष्ठ पत्रकार चंद्रचकोर कारखाने यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष एल.पी.उगीले ,स्पर्धा संयोजक प्रा.प्रवीण जाहुरे यांनी जाहीर केले.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गेल्या १४ वर्षांपासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता, शोध वार्ता व शाश्वत विकास या तीन गटात पुरस्काराचे आयोजन केले जाते. पुरस्काराचे हे १५वे वर्ष आहे.
पुरस्कार पुढीलप्रमाणे :
उत्कृष्ट वार्ता गट :- प्रथम पुरस्कार : दै.सकाळचे उजनी ता.औसा जि.लातूर येथील प्रतिनिधी केतन ढवण यांच्या 'दुभंगून जाता-जाता अभंग झालो !' या बातमीस अर्जुन मूद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. व्दितीय पुरस्कार : दै.पुण्यनगरीचे शिरुर जि.बीड येथील प्रतिनिधी गोकुळ पवार यांना 'मुलाने बसस्थानकावर बेवारस सोडलेल्या बापाला मुलीने स्विकारले' बातमीस वृत्तपत्रविद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर यांच्यावतीने ३००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तृतीय पुरस्कार : दै.पुढारीचे किनगाव ता.अहमदपुर जि.लातूर येथील प्रतिनिधी गोरख भुसाळे यांच्या 'सुट्यांतील मामाच्या गावची ओढ ओसरतेय, भाचे कंपनीचा पर्यटनावर खाजगी शिकवणीचा परिणाम' या बातमीस प्रा.प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ २००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
शोधवार्ता गट :- प्रथम पुरस्कार : दै.लोकप्रश्नचे बीड येथील प्रतिनिधी सुशिल देशमुख यांच्या 'खरच उद्योजक घडवायचे की, तरुणांना आशेला लावायचंय?' या बातमीस जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५००० रु.रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र. व्दितीय पुरस्कार : दै.पुढारीचे चाकूर जि.लातूर येथील प्रतिनिधी संग्राम वाघमारे यांच्या 'चाकूर तालुक्यातील २७ जि.प.शाळांचे भवितव्य धोक्यात येणार' या बातमीस वृत्तपत्र विद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर यांच्यावतीने ३००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार : दै.सकाळचे सिल्लोड प्रतिनिधी सचिन चोबे यांच्या 'ऑक्सिजन यंत्रणा असुन अडचन नसुन खोळंबा' या बातमीस राजकुमार मोगले यांच्यावतीने कै.व्यंकटराव कलप्पा मोगले यांच्या स्मरर्णार्थ २००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र .
विकास व शाश्वत विकास वार्ता गट :- प्रथम पुरस्कार : दै.सकाळचे फुलंब्री जि.छ.संभाजीनगर येथील प्रतिनिधी नवनाथ इधाटे यांच्या 'महिला कुटुंबालाच नव्हे तर समाजाला दिशा देते' या बातमीस गोविंद सावरगावे यांच्यावतीने कै.गुणवंतराव बाजीराव सावरगावे यांच्या स्मरणार्थ ५००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ,
व्दितीय पुरस्कार : दै.पुण्यनगरीचे शिरुर जि.बीड येथील प्रतिनिधी गोकुळ पवार यांच्या 'खोलेवाडीच्या खव्याचा गोडवा कुंथलगिरीकरांच्या पडला प्रेमात' या बातमीस वृत्तपत्र विद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्यावतीने ३००० रु.रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र. तृतिय पुरस्कार : दै.लोकप्रश्नचे बीड येथील प्रतिनिधी सुशिल देशमुख यांच्या 'जिल्ह्याची भुजल पातळी१०७ %ने वाढली' या बातमीस जेष्ठ पत्रकार कै.नागनाथ निडवदे यांच्या स्मरर्णार्थ २००० रु.रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषकाचे स्वरुप आहे.
परीक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहा.संचालक, विभागीय माहिती कार्यालय लातूर चे श्याम टरके, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचे जनसंवाद विभागाचे प्रा.डाॅ.शिवशंकर पटवारी यांनी पाहिले तर जेष्ठ पत्रकार एल.पी.उगीले, जेष्ठ पत्रकार राम हडोळे, डाॅ.धनाजी कुमठेकर व प्रा.प्रवीण जाहूरे या निवड समितीने जीवन गौरव पुरस्काराची निवड केली. सन २०२२ व २०२३ या दोन वर्षाचे पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे.
एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सचिव पत्रकार गोकुळ पवार यांना उपरोक्त पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यकारिणी व सकल एकता परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

