वडाळा महादेव प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तुकाराम सोनवणे हायस्कुल या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याकार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे, संस्थेच्या सचिव संगीता खिल्लारे ,तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव कांबळे (माजी जिल्हा नियोजन अधिकारी ) अशोकराव बोरुडे (माजी गटविकास अधिकारी श्रीरामपूर ) एकनाथ पाखरे- (धम्मरत्न मित्र मंडळ सचिव) सुरेंद्र ढवळे तसेच तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे ज्ञानसंदिप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे,अमोल बोर्डे आदि. उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने पुष्पहार व संस्थेची माहिती पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्था अंतर्गत चालणाऱ्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग मान्यवरांना तसेच पालक वर्गांना दाखवून मान्यवरांचे व पालकांची मने जिंकली, यामध्ये सिक्युरिटी अलार्म ,पवनचक्कीवर चालणारी वीज, चंद्रयान ३, होलोग्राम व्हिडिओ प्रोजेक्टर ,फायर अलार्म, पृथ्वीची दिनचर्या , पलटता तीर, सॅनिटायझर मशीन, पाण्याची घनता, हवेचा दाब , फुफुसाचे कार्य, पर्यावरण रक्षण, पाणी पुनर्भरण, जमिनीची धूप चुंबकीय शक्ती, रोबोटिक हॅन्ड , जेसीबी ,पाण्याचे विघटन, असे एकूण १३० प्रयोगाची मांडणी विद्यार्थ्यांनी केली होती.
यावेळी एकनाथ पाखरे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती माहिती दिली, तसेच श्री.कांबळे साहेब यांनी विज्ञान प्रदर्शनाची फीत कापून उद्घाटन केले,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोनवणे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे सर, पदवीधर शिक्षिका बोरुडे मॅडम, वरिष्ठ शिक्षक चौधरी सर, साहेबराव शिंदे सर, नजमा खान, अजय कुमार खिल्लारे, किरणकुमार सोनवणे, विजय आघाव, गौतम मकासरे,नय्युम शेख, आनंद सातदिवे, हर्षल पगारे, ताहेरा पठाण ,उज्वला शिवाय तसेच कर्मचारी मल्लेखां पठाण, सुनिता शेजुळ यांनी मेहनत घेतली. मान्यवरांनी प्रयोगाच्या निरीक्षण करून खालील प्रमाणे काढले आहेत.
१.पवन ऊर्जा (इयत्ता नववी)
२.बायोगॅस ऊर्जा (इयत्ता आठवी)
३.सिक्वर्टी आलाराम (इयत्ता दहावी)उत्तेजनार्थ विभागुण चंद्रयान ३ (इयत्ता सातवी) व फायर सिक्वर्टी आलाम (इयत्ता सातवी)कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अभिजीत सोनवणे सर यांनी केले
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

