shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*"अ.आ.नि.स.तर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त धुळ्यात विरंगणा पुरस्कार कार्यक्रम संपन्न


धुळे प्रतिनिधी:
बुधवार दि.३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व महीला मुक्तीदीनाचे औचित्य साधून धुळे  येथील सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींना, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते स्मृतीचिन्ह सन्मानपत्र गुलाबपुष्प फेटा शाल देत "आदर्श विरंगणा पुरस्कार" देवुन कृष्णा रिसॉल्ट धुळे या ठिकाणी सन्मानिय करण्यात आले. 

या प्रसंगी प्रथम सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच हार व गुलाबपुष्प अर्पण व्दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. प्रस्तावित कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष व अआनिसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती प्रो.प्रेमलताताई जाधव यांनी केले. या प्रसंगी विचारपिठावर राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ,   महाराष्ट्र निमंत्रक प्रदीपनाना गांगुर्डे, नाशिक जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड, सौ.सरोजताई कदम, नाशिक जिल्हा संघटक प्रदीपजी पगारे, खेडे सरपंच व जिल्हा सचिव प्रमोदजी आहीरे, ठाणे जिल्हाप्रमुख सचिन गाडे, निफाड तालुकाध्यक्ष नितीन खडताळे, तालुका कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, मालेगांव शहर उपाध्यक्ष प्रेम आहीरे, अंबरनाथ शहराध्यक्ष आशाताई शहा, उत्तर महाराष्ट्र संघटक ललीताताई निकम  उपस्थित होत्या. 
या वेळी संजयबाबा गायकवाड व प्रदीपनाना गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात रविंद्रदादा जाधव म्हणाले की, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ही महाराष्ट्रातील १००% निस्वार्थ सामाजिक संघटना असून महाराष्ट्रातील  तरुण तरुणी ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच  स्वावलंबी बनावा या उद्देशाने महीला पुरुष व युवक युवती तसेच तृतीयपंथी वर्गात अत्याचाराविरुद्धची चीड व गरजुंना स्वयंरोजगार निर्माण करणारी संघटना आहे. महीला युवक युवती ह्या समितीच्या माध्यमातून सक्षम बनुन स्वताचा उद्योग धंद्या टाकून सकारात्मक बनावा, त्याला त्याच्या उद्योग उभारणीसाठी वेगवेगल्या प्रशिक्षणाची, मार्गदर्शनाची आणि आर्थिक सहाय्याची गरज आहे. हे ओळखून त्याच्या त्या गरजा पूर्ण करणेसाठी समिती ही सतत प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी केले. पुरस्कार्थी मध्ये सुनिताताई सोनार, जोशिलाताई पगारिया, ललीताताई शिरसाट, शोभाताई नगराळे, ॲड.मधुमती ठाणगे, सारीकाताई सुर्यवंशी, प्रतिभाताई महीरे, वैशालीताई पाटील, मंगलताई गायकवाड, शांतीताई कमल, वंदनाताई गव्हाणे, रेखाताई शिरुडे, परमजितकौर आदीं विरंगणांचा समावेश होता. या प्रसंगी धुळे जिल्हा व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी सौ.जोशिलाताई पगारिया, जिल्हा कार्याध्यक्षा सारीकाताई सुर्यवंशी, जिल्हा अध्यक्षा उज्वलाताई पगारे, प्रतिभाताई वाघ, जिल्हा सरचिटणीस अनिताताई बैसाणे, जिल्हा चिटणीस माधुरीताई निकम, जिल्हा संघटक मालतीताई सुर्यवंशी, अलकाताई कापुरे, जिल्हा सल्लागार ॲड.मधुमती ठाणगे, ॲड.सुलभा ठाणगे, जिल्हा कोषाध्यक्ष सरलाताई निकम, प्रसिध्दीप्रमुख पत्रकार सोपान देसले, सोनल रुणवाल, शहर कार्याध्यक्ष ॲड.एकाग्रता निळे, शहर उपाध्यक्षा सरला गायकवाड, वैशालीताई भावसार, लुब्धा राजेश सुर्यवंशी, शहर सरचिटणीस ॲड.सुप्रभा ठाणगे, शहर चिटणीस अश्विनी सोनार , शहर सहचिटणीस गिता कटारिया, शहर संघटक परमजित कौर, भाग्यश्री विभांडीक, इत्यादी उपस्थित होते. 
सुत्रासंचालन गाळणकर यांनी केले तर आभार लुब्धा सुर्यवंशी यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
 स्वाभिमानी संपादक सेवा संघ

*वृत्तविशेष सहयोग*
पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी 

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close